E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थव्यवस्थेसाठी कर व्यावसायिकांचे मोलाचे योगदान
Wrutuja pandharpure
11 May 2025
पुणे
: पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्यासाठी कर सल्लागार, सनदी लेखापाल यांच्यासह करदात्यांची भूमिका मोलाची आहे. योग्य करसंकलन व व्यवस्थापन, पारदर्शी अर्थव्यवस्था यासाठी आर्थिक क्षेत्रातील व्यावसायिकांनी अर्थकायद्यातील नवे बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता, चॅट जीपीटीसारखे प्रगत तंत्रज्ञान व नवी कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असे प्रतिपादन केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अपील प्राधिकरणाचे सदस्य सीएमए बी. एम. शर्मा यांनी केले.
महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या (एमटीपीए) वतीने आयोजित ’अमृत ज्ञानकुंभ २०२५’, या दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. गणेशखिंड रस्त्यावरील कॉसमॉस टॉवरमधील सहकार भवन येथे ही दोन दिवसांची परिषद होत आहे. ’कर सल्लागार : पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ’ अशी या कर परिषदेची संकल्पना आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्स (एआयएफटीपी), जीएसटी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (एनएमटीपीए) या संस्थांचे सहकार्य या राष्ट्रीय कर परिषदेसाठी लाभले आहे.
याप्रसंगी ’एआयएफटीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष समीर जानी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय कर परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे व ’एमटीपीए’चे अध्यक्ष प्रसाद देशपांडे, उपाध्यक्ष श्रीपाद बेदरकर, ज्येष्ठ कर सल्लागार निकिता बढेका, विधिज्ञ दीपक गोडसे, विनायक पाटकर, नारायण जैन, संतोष गुप्ता, ऍड. भास्कर पटेल,नितीन गौतम, ’एमटीपीए’चे उपाध्यक्ष अनुरुद्र चव्हाण आदी उपस्थित होते. प्रसंगी विशेष स्मरणिकेचे, एमटीपीए टॅक्स ट्रिब्यूनचे आणि प्रकाश पटवर्धन लिखित जीएसटी (तिसरी आवृत्ती) या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. ’एआयएफटीपी’च्या नव्या संकेतस्थळाचेही अनावरण झाले. ऍड. दीपक गोडसे यांनी ’एमटीपीए’ला पाच लाखांचा धनादेश देणगी स्वरूपात सुपूर्त केला.
बी. एम. शर्मा म्हणाले, तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामध्ये क्रांतिकारी बदल होत आहेत. कायद्यांमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. या सर्व गोष्टी शिकून घ्यायला हव्यात. स्वतःला अद्ययावत ठेवणे हे गरजेचे आहे.समीर जानी म्हणाले, नवे व्यावसायिक ट्रेंड्स शिकत राहा. नवे तंत्रज्ञान आत्मसात करा. युवा व्यावसायिकांमध्ये नवी कौशल्ये, नवकल्पनांचे प्रशिक्षण कसे होईल, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. नरेंद्र सोनवणे यांनी प्रास्ताविकात कर परिषदेची संकल्पना स्पष्ट केली.
Related
Articles
जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक
01 Jun 2025
भारत-नेपाळ सीमेवर प्रवास टाळा
02 Jun 2025
प्रवाशांची लाडकी डेक्कन क्वीन उद्या होणार ९६ वर्षांची
31 May 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
डिजीटल अॅरेस्टची भिती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक करणार्यास अटक
03 Jun 2025
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिकेचा १४८व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल